Posts

Showing posts from February, 2026

महाशिवरात्री : एक संकल्प

महर्षि दयानंद सरस्वती: ओम्           महाशिवरात्री -बोध  जो बुद्धिमान मनुष्य शिवसंकल्पला जागतो त्याच्यासाठी प्रत्येक रात्र शिवरात्र असतेआणि जो जीवनात प्रत्यक्ष शिवसंकल्प जगतो त्याच्या साठी प्रत्येक रात्र महाशिवरात्र ठरते. म्हणून प्रत्येकाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी यजुर्वेद 34/1-6या(शिवसंकल्प उपनिषद)मन्त्राचा अर्थ बोधा सह पाठ केला पाहिजे.त्यात "तन्मे मन :शिवसंकल्पमस्तु "या पालूपदाने परमात्म्याची आळवानी करीत भक्त म्हणतो हे शिव शंकर!तुम्ही माझ्या मनाला सत्य ज्ञानाने, कल्याणकारी विचाराने व शुद्ध पवित्र भावनेने भरा. माझे मन शुभ संकल्पी होऊ दे. अशी प्रार्थना करण्याचे कारण असे की मन अद्भुत शक्ति व सामर्थ्यशाली आहे, अत्यन्त वेगवान व संकल्प -विकल्प वाला आहे. तो सहजा सहजी बुद्धीच्या अधीन होत नाही. दुसरे असे की मन हेच बंध आणि मोक्षाचे कारण आहे. बंधन हे सुख दुःख मिश्रित आहेआणि मोक्ष आंनदमय आहे. आत्म्यास आंनदाची अभिलाषा आहे. तेव्हा आत्म्याच्या आनंद यात्रेत मनाची मोठी भूमिका आहे.मन एकाग्र, शांत व शुभ संकल्पी झाले तरच यात्रा योग्य दिशेने व उत्तम गति -रीतीने सफल संम...