महाशिवरात्री : एक संकल्प


महर्षि दयानंद सरस्वती: ओम् 
         महाशिवरात्री -बोध 
जो बुद्धिमान मनुष्य शिवसंकल्पला जागतो त्याच्यासाठी प्रत्येक रात्र शिवरात्र असतेआणि जो जीवनात प्रत्यक्ष शिवसंकल्प जगतो त्याच्या साठी प्रत्येक रात्र महाशिवरात्र ठरते. म्हणून प्रत्येकाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी यजुर्वेद 34/1-6या(शिवसंकल्प उपनिषद)मन्त्राचा अर्थ बोधा सह पाठ केला पाहिजे.त्यात "तन्मे मन :शिवसंकल्पमस्तु "या पालूपदाने परमात्म्याची आळवानी करीत भक्त म्हणतो हे शिव शंकर!तुम्ही माझ्या मनाला सत्य ज्ञानाने, कल्याणकारी विचाराने व शुद्ध पवित्र भावनेने भरा. माझे मन शुभ संकल्पी होऊ दे. अशी प्रार्थना करण्याचे कारण असे की मन अद्भुत शक्ति व सामर्थ्यशाली आहे, अत्यन्त वेगवान व संकल्प -विकल्प वाला आहे. तो सहजा सहजी बुद्धीच्या अधीन होत नाही. दुसरे असे की मन हेच बंध आणि मोक्षाचे कारण आहे. बंधन हे सुख दुःख मिश्रित आहेआणि मोक्ष आंनदमय आहे. आत्म्यास आंनदाची अभिलाषा आहे. तेव्हा आत्म्याच्या आनंद यात्रेत मनाची मोठी भूमिका आहे.मन एकाग्र, शांत व शुभ संकल्पी झाले तरच यात्रा योग्य दिशेने व उत्तम गति -रीतीने सफल संम्पन्न होऊ शकते.
कुणी तरी म्हटले आहे -"मनके बिगडनेसे बिघडता हॆ आदमी 
सुधरा अगर मन तो आदमी सुधर गया l "
म्हणून मनाला शिवसंकल्पाने युक्त करण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना करावी लागते. त्यामुळे मन हळू हळू अंधाराकडून प्रकाशाकडे, असत्या कडून सत्या कडे आणि मृत्यु कडून अमृताकडे आकर्षित व्हायला लागतं.

महर्षि दयानंद सरस्वती:
बहुजन हिताय, बहुजन सुखाय "या अवधारणेनी भावित अशा सण उत्सवामधून हाच बोध प्राप्त होतो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ला शिवरात्री असे नाव आहे. चतुर्दशी म्हणजे अमावास्या च्या अगोदरची रात्र. यावरून असे समजावे की -जीवनाची अमावास्या होऊ द्यायची नसेल तर वेळीच जागे व्हा. रात्र वै ऱ्यांची आहे. जाणू हा सावधानतेचा ईशारा च आहे. महाशिवरात्री बाबतीत ही असाच संदेश आहे. महाशिवरात्री हा सण माघ कृष्ण चतुर्दशिला साजरा केला जातो. माघ महिना हा क्षय महिना आहे. 11वा महिना आहे.यानन्तर चा 12वा फाल्गुन महिना संम्पला की नवसं वत्सराचे आगमन होते. वसंत ऋतुचे साम्राज्य असते. येथेही हाच संकेत असावा की -हे मनुष्यानो!जीवनात वसंत फुलवायचा असेल तर सावध व्हा. आत्मचिंतन करा. शिव संकल्पात जर शिथिलता आली असेल तर दूर करा. कुणीतरी म्हटले आहे -वसंत मनात ठेऊन, शिशिर झेलता आला पाहिजे l बाण सोडायचा असेल दूर तर, धनुष्य पेलता आले पाहिजे l
पौराणिक जगतात 11या संखेला बरेच महत्व दिले गेले आहे. जसे दर महिन्यातील दोन्ही पक्षातील एकादशीला उपवास धरला जातो.
रुद्राची संख्या 11मानली गेली आहे
1)प्राण -10+आत्मा -1=11
2)इंद्रिय -10+मन -1=11
माघ महिना 11वा म्हणून शिव /रुद्राची आराधना, उपासना. आत्मा /मन 11वे रुद्र. यावरून या सणा मागचा आशय सुसंगत वे स्पष्ट होतो.

महर्षि दयानंद सरस्वती:
शिव -रुद्र हे दोन्ही नावं एका ईश्वराचीच आहेत.ईश्वर दुष्टाना शिक्षा करून रडवितो म्हणून रुद्र, मंगलमय आणि सर्वांचे कल्याण करणारा म्हणून शिव आहे.पालन, पोषण व रक्षण शक्तीचे नावं आहे शिव आणि संहार शक्तीचे नाव आहे रुद्र. शिव आणि रुद्र हे एकमेकांचे पूरक आहेत. जसे न्याय आणि दया हे दोन्ही एकाच कार्याचे दोन रूप आहेत. एक संत वचन आहे -"दया तिचे नाव, भूतांचे पालन l 
आणिक निर्दालन, कंटकाचे l "
जे सरळ, सुस्वभावी सज्जनाना, दीन-दुबळ्याना, निरपराध्याना सता वतात, अन्याय अत्याचार करतात, शोषण करतात, त्यांच्याशी धोकाधडी व कपट कारस्थान करतात, त्यांना रडवतात अस्याना दुष्ट म्हणतात.
अशा दुर्जनांचे हनन करणे यातच सज्जनाचे रक्षण निहीत आहे.ऋगवेद येजुर्वेद, अथर्व वेदा मध्ये रुद्रासाठी अनेक नावं आलेली आहेत. तो सर्वव्यापक असल्यामुळे त्याची नावं ही असंख्य आहेत.
1)यज्ञ -रुद्र आहे. कारण यज्ञ पर्यावरणातील प्रदूषण नष्ट करतो आणि हवा शुद्ध करतो. 2)वृक्ष वनस्पती हे ही रुद्र आहेत. 'ते कार्बन डाई ऑकसाइड पितात. व ऑक्सिजन सोडतात. 3)वैद्य -रुद्र 
आहे. तो रोग्याच्या शरीरातील रोगजंतूना मारतो आणि रोग्याला रोगमुक्त करून त्याला प्रसन्न करतो.
4)न्यायाधीश -रुद्र आहे. तोही सत्य -असत्याची परीक्षा करून पक्षपातरहित होऊन अपराध्यास उचित दंड देऊन रडवितो आणि निरापराद्याला न्याय मिळवून देतो. 
5)सेनापती -रुद्र आहे.शत्रूना धाराशाई करतो आणि देशाचे व देशावासियांचे रक्षण करतो. 
6)आचार्य, गुरु, ऋषीं -मुनी, संत, योगी, विद्वान पुरोहित, वेदोपदेशक हे ही रुद्र म्हणविले जातात. कारण 'ते अज्ञान, अविद्या, अंधश्रद्धा, जाचक रूढी परंपरा, ढोंग पाखंड, नास्तिकता,दुर्गुण दुर्व्यसन, दुराचार भ्रष्टाचार व मांसाहार वगैरे हानिकारक गोष्टीचा विरोध, वा खंडन करतात. आणि वेद विद्येचा, सत्य धर्माचा प्रचार प्रसार करतात. माणुसकीचे धडे देतात.

महर्षि दयानंद सरस्वती: 
शिव आणि रुद्राचे आदर्श महर्षी दयानंद सरस्वती.त्याचे बालपणीचे नावं मुलशन्कर. वयाच्या 14व्या वर्षी त्यानी महाशिवरात्रीचे व्रत केले होते. शिवजिच्या भेटीची अत्यंत्यिक ओढ होती.अत्यन्त श्रद्ध्येने, पवित्र भावनेने त्या बालकाने जागरण व उपवास केला होता. म्हणूनच की काय त्या बालकाला त्या रात्री बोध झाला.शन्कराच्या सत्य स्वरूपाला जाणून घ्येण्याची जीज्ञासा जागी झाली. आणि या जागरणाने मूल शन्कराच्या जीवनाचा कायापालटच झाला. मूल शंकर पुढे चालून महर्षी दयानंद या नावाने प्रकट झाला.त्यांनी ईश्वराचे सत्य स्वरूप वेदाधारे पटवून दिले. ईश्वर स्तुति प्रार्थना व उपासना याचा भावार्थ समजावून सांगितला. भक्ति म्हणजे ईश्वराची आज्ञा पालन करणे असे सांगितले. उपवास, उपासना, पूजा व भक्ती याचे हेच मर्म आहे -जसे कुणीतरी म्हटले आहे -"खुदा की हॆ इबादत खुदा -सा बन जाऊं l 
परमात्म्याचचे 'ते खरे उपासक होते. त्यांच्या जीवनात अर्थात त्यांच्या विचारात, लेखणात, धार्मिक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्यात शिव शक्तीचा व रुद्र शक्ति चा सर्वत्र वावर दिसतो. अगदी आर्य समाजाच्या स्थापना मागे सुद्धा शिव तत्वाचा व रुद्र तत्वचाच विचार आहे. संसार का उपकार करना -हा शिव तत्व आहे तर "सत्य के ग्रहण करने और असत्य के छोडने मे सर्वदा उद्यत रहना चाहिए l अविद्या का नाश और विद्या की वृद्धी करनी चाहिये l या नियमात रुद्र तत्व आहे.
आपल्या दिव्य गुण कर्म स्वभावाने त्यानी आपल्या नावाला सार्थक केले.
जय हो दयानंद, जय जय दयानंद.

Comments